पुणे

पुरंदर : मांढर ग्रामपंचायत बिनविरोध

संतोष जंगम

परिंचे : मांढर (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ पैकी आठ जागांवर बिनविरोध महिलांची निवड करण्यात आली असून एका जागेवर पुरुषाची निवड करण्यात आली. सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून महाआघाडी कायम राखण्यास मांढर ग्रामस्थांना यश आले असून, तालुक्यातील अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी महिला उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

मांढर ग्रामपंचायत नऊ सदस्यांची असून नऊ जागांसाठी सतरा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गावची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक ग्रामस्थ प्रयत्न करीत होते.

शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेऊन शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आल्या असून महिलांना संधी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. टोणपेवाडी व शिंदेवाडीमधून दोन महिला व एक पुरुष बिनविरोध देण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब कांबळे यांनी जाहीर केले. 

प्रभाग क्रमांक एकमधून शिल्पा दत्तात्रय शिर्के, किरण स्नेहल काशीद, वर्षा संतोष शिर्के. प्रभाग क्रमांक दोनमधून वंदना बाळासाहेब शिर्के, वनिता संतोष शिर्के, ज्योती बाळासाहेब खोमणे. प्रभाग क्रमांक तीनमधून कावेरी सुशांत सुकल, पूजा संजय गाडी, मंगेश प्रल्हाद जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी तानाजी शिर्के, महादेव पापळ, दत्तात्रय पापळ, अमोल पापळ, शामराव पापळ, संतोष पापळ, अविनाश शिर्के, सुरेश शिर्के यांनी प्रयत्न केले होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT