पुणे

मांजरीतील मांजराई देवी मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

CD

मांजरी, ता. १६ : अज्ञातवासातील प्रवासात पांडवांनी आपली आई माद्रीच्या आठवणीत उभारलेले मांजराई देवी मंदिर मांजरी बुद्रुक (ता. हवेली) गावचे ग्रामदैवत आणि शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. हेमाडपंथी शैलीतील या काळ्या पाषाणातील मंदिराला पांडवकालीन इतिहासाची मोठी पार्श्वभूमी लाभली असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येथे चैतन्याचे वातावरण आहे.

अख्यायिकेनुसार, पांडव माता माद्रीसह प्रवासात असताना मुळा-मुठेच्या उजव्या कुशीत मुक्कामी राहिले होते. या मुक्कामात त्यांनी आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ मंदिर बांधले. सूर्योदय झाल्याने कळसाचे काम अपूर्ण ठेवून ते पुढच्या प्रवासाला निघाले. हेच माद्रीचे मंदिर पुढे अपभ्रंश होऊन ''मांजरी'' झाले आणि त्याभोवती वसलेल्या खेड्याला मांजरी बुद्रुक नाव पडले. अकरा वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. भक्तांना शक्ती देणारी आणि संकल्प तडीस नेणारी महाशक्ती म्हणून मांजराई देवीकडे पाहिले जाते.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरती, जागरण व गोंधळ असे धार्मिक कार्यक्रम होत आहेत. नऊ दिवस देवीची विविध रूपांत पूजा बांधली जाते. दसऱ्याच्या दिवशी येथे सिमोलंघनाचा सोहळा होतो. नोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले नागरिक या काळात दर्शनासाठी आवर्जून गावात येतात. चंपाषष्ठीला देवीचा मोठा उत्सव भरविला जातो, ज्यामध्ये घराघरातून नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

जिल्हा बँक संचालक सुरेश घुले, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानोबा घुले, उत्सव समितीचे माजी अध्यक्ष कैलास घुले, उपाध्यक्ष अभिजित घुले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा उत्सव होत आहे.
-------------------------------
पाच-सहा वर्षांपूर्वी गावाचा पुणे महापालिकेत समावेश झाल्याने नागरीकरण वाढल्याने भाविकांची गर्दीही वाढत आहे. अखिल मांजराई देवी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने उत्सवाचे नियोजन केले जात असून, विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
-स्वराज घुले- अध्यक्ष, निखिल मांजराई देवी नवरात्र उत्सव समिती
---------------------------
मांजराई देवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Squad: न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! वनडे मालिकेत २ कर्णधार का? शुभमन गिलनंतर श्रेयस अय्यरकडे धुरा; नेमकं कारण काय?

UP Mega Survey: उत्तर प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कुणाला? योगी, अखिलेश की मायावती?

Delhi Protest High Drama : कॅनॉट प्लेसमध्ये 'तिरंगा मार्च'वरून प्रचंड गदारोळ; अभिजीत दिपके, नेहा बोरांसह १५० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी उचलले!

Swargate to Katraj Metro Work : मेट्रोच्या कामासाठी कात्रज चौकात आजपासून वाहतुकीत बदल; जड वाहनांना प्रवेशबंदी

Starlink India Controversy : "माझा मोदींना विरोध आहे, पण बाहेरचा गोरा माणूस भारताचे निर्णय घेऊ शकत नाही!"; इलॉन मस्कवर असदुद्दीन ओवेसी

SCROLL FOR NEXT