maratha reservation  Sakal
पुणे

Maratha Reservation : पुणे शहरात मराठा समाज सर्वेक्षणाचे काम ८२ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण

राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्यासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचे काम बुधवारी ८२ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्यासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचे काम बुधवारी ८२ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले. त्यानुसार, नऊ लाख ६५ हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. दिलेल्या मुदतीत (३१ जानेवारी) सर्वेक्षण पूर्ण होऊ शकत नसल्याने राज्य सरकारने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे उर्वरित सर्वेक्षण दोन दिवसात पूर्ण होण्याची शक्‍यता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाकडून मराठा समाज सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासलेपण तपासण्याचे काम या सर्वेक्षणाद्वारे केले जात आहे. संबंधित सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले होते.

पुणे शहरात १२ लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लिपिक, अन्य कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक असे तीन हजार 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र शहराचा विस्तार व लोकसंख्येचा विचार करता, संबंधित सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता नव्हती.

त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य सरकारकडे सर्वेक्षणासाठी पाच दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, राज्य सरकारने सर्वेक्षणासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे महापालिकेला सर्वेक्षण करण्यासाठी दोन दिवस उपलब्ध झाले.

बुधवारी, ३१ जानेवारीपर्यंत शहरात सुमारे ८२ टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, त्यामध्ये नऊ लाख ६५ हजार घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. आता उर्वरित अडीच ते तीन लाख घरांपर्यंत पोचण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. मात्र राज्य सरकारने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या दोन दिवसात उर्वरित सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल, अशी शक्‍यता महापालिकेच्या उपायुक्त व सर्वेक्षणासाठी नेमलेल्या नोडल अधिकारी डॉ.चेतना केरूरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT