Manoj Jarange Patil sakal
पुणे

Maratha Reservation: मराठ्यांच्या जागेवर लागलेल्यांना बाहेर काढून त्यांची संपत्ती जप्त करावी : मनोज जरांगे

प्रफुल्ल भंडारी

Marathi Reservation: मराठा समाजाला षडयंत्र करून सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. मराठ्यांच्या जागेवर नोकरीला लागलेल्या सगळ्यांना बाहेर काढून त्यांची सपंत्ती जप्त करावी, अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे यांनी ही मागणी केली. मराठा आरक्षणाविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आरक्षण नसल्याने समाजाचे मोठे नुकसान होण्याबरोबर समाजविकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे.

जर सत्तर वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले असते तर जगाच्या पाठीवर मराठा समाज सर्वात प्रगत जात ठरली असती. मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आणि पुरावे नसल्याचे कारण देत आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. एकीने लढा दिल्यानंतर आणि आंदोलन केल्यानंतर जिल्हा जिल्ह्यात नोंदी कशा सापडू लागल्या ?, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे नाहीतर नंतर समाज त्यांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शेतीचा बांध फोडला तर दोन वर्षे बोलत नाही.

विरोध करणार्यांसाठी आम्हाला हातात दगड घ्यायची पण गरज नाही कारण आम्हा शेतकरी व कष्टकर्यांचा हातच त्यासाठी पुरेसा आहे. १ डिसेंबर पासून गावोगावी साखळी उपोषण सुरू कराक आणि २४ डिसेंबर पर्यंत सावध राहावे. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT