पुणे

अखंड मराठा समाजाची अकलूज येथे बेठक

CD

अखंड मराठा समाजाची
शनिवारी अकलूजमध्ये बेठक
सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता. १९ : समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार असून, त्याच्या नियोजनासाठी शनिवारी (ता. २३) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सर्वपक्षीय मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण, कुणबी दाखले व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे- पाटील यांचे प्राणांतिक उपोषण शनिवारपासून (ता. ३०) सुरू होत आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून समाज बांधवांच्या नियोजनासाठी शनिवारी (ता. २३) सायंकाळी ५ वाजता डॉ. धनेश गांधी हॉस्पिटल शेजारील कृष्ण लीला बँक्वेट हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आमरण उपोषणे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे. यानंतर दोन वेळा राज्यातील संपूर्ण मराठा समाज मुंबईत मोठ्या संख्येने गेला होता. मात्र, आश्वासनांशिवाय काहीही हाती लागले नसल्याची भावना समाजात आहे. अनेकदा मुदती देऊनही शासनाने फसवणूक केल्याची भावना निर्माण झाल्याने, शेवटी ‘आर नाही तर पार’ ही भूमिका घेत मनोज जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्या या उपोषणाला राज्यातील मराठा समाजाचा पाठिंबा असून, माळशिरस तालुक्यातूनही हजारो बांधव सहभागी होणार आहेत. त्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, सर्व मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : मॉर्निंग वॉकला जाताय, सावधान! पुण्यात रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाची ७० हजारांची सोन्याची चैन पळवली

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT