पुणे

मलवडी येथे ''एनडीआरएफ'' कडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

CD

''एनडीआरएफ''तर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मलवडीत बचाव-मदतकार्याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन

​दहिवडी, ता. ११ : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य प्रतिसाद कसा द्यावा, याचे धडे मलवडी (ता. माण) येथे ५ बटालियन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या पथकाकडून देण्यात आले. या वेळी पथकातर्फे ‘समुदाय जागृती कार्यक्रम’ आणि शालेय सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले.

‘समुदाय जागृती कार्यक्रम’अंतर्गत ग्रामस्थांना आपत्तीपूर्व तयारी, पूर व इतर संकटांवेळी घ्यावयाची काळजी, सुरक्षित स्थलांतर आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्य कसे करावे, याविषयी माहिती दिली. त्रिंबकराव काळे विद्यालय आणि श्री शांतिगिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल येथे ‘शालेय सुरक्षा कार्यक्रम’ झाला. या वेळी पथकातील जवानांनी विद्यार्थ्यांना भूकंप, पूर, आग लागणे, वीज पडणे अशा आपत्तींमधून स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. या उपक्रमात एनडीआरएफच्या पथकातील इन्स्पेक्टर अंकितकुमार यादव, हवालदार राहुल जगदाळे व अविनाश बाबर, रेस्क्यूअर गजानन पात्रिकर, खंडू कांबळे व टिंकू कुमार यांनी सहभाग घेतला.
..........

07755
मलवडी : विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करताना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सदस्य. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
..........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Circular : राज्य सरकारचा मोठा निर्णय! दहीहंडीची सुट्टी रक्षाबंधनाला जाहीर, शुद्धीपत्रक जारी

Bhimashankar Temple: भाविकांसाठी मोठी बातमी! श्रावणात भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत खुले राहणार; ऑनलाइन बुकिंग

IND vs SL Test : श्रीलंकेने कसोटी संघ का जाहीर केलेला नाही? दोन खेळाडूंनी वाढवली डोकेदुखी; ४ दिवसावर पहिली कसोटी अन्...

Marathi News Live Updates : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Almatti Dam Water Level : आलमट्टी धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! 24 तासांत 89 हजार क्युसेकने पाण्याची आवक; पाणीसाठा 119 टीएमसीवर...

SCROLL FOR NEXT