पुणे, ता. १७ : एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील एकूण ११ हजार ४३१ जागांपैकी १० हजार ३९५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. आता प्रवेशासाठी एकूण एक हजार ३६ जागा शिल्लक आहेत.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. या प्रवेशाच्या आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीत आठ हजार ८१४ जागा उपलब्ध होत्या. त्यात आठ हजार २८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यातील ५२६ जागा आता रिक्त आहेत, तर बीडीएस अभ्यासक्रमात तिसऱ्या फेरीत एकूण दोन हजार ६१७ जागांपैकी दोन हजार १०७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी ५१० जागा रिक्त आहेत.
रिक्त जागांसाठी तीन फेऱ्या होणार
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय परिषदेकडून प्राप्त वेळापत्रकानुसार रिक्त जागांच्या (ऑनलाइन स्ट्रे व्हेकन्सी) फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक सीईटी कक्षाने यापूर्वीच जाहीर केले आहे. रिक्त जागांवरील प्रवेशासाठी तीन फेऱ्या होणार आहेत.
एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीअखेर प्रवेश
महाविद्यालय : उपलब्ध जागा : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : रिक्त जागा : टक्केवारी
शासकीय : ५,०६५ : ५,०४५ : २० : ९९.६० टक्के
खासगी : ३,७४९ : ३,२४३ : ५०६ : ८६.५० टक्के
एकूण : ८,८१४ : ८,२८८ : ५२६ : ९४.०३ टक्के
बीडीएसच्या तिसऱ्या फेरीअखेर प्रवेश
महाविद्यालय : उपलब्ध जागा : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : रिक्त जागा : टक्केवारी
शासकीय : ३१७ : २९१ : २६ : ९१.७९ टक्के
खासगी : २,३०० : १,८१६ : ४८४ : ७८.९५ टक्के
एकूण : २,६१७ : २,१०७ : ५१० : ८०.५१ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.