पुणे

बोधेगाव -ढाकणे शैक्षणिक संकुलात एमसीए अभ्यासक्रमाची भर

CD

ढाकणे शैक्षणिक संकुलात एमसीए अभ्यासक्रमाची भर

बोधेगाव, ता.१५ ः राक्षी (ता. शेवगाव) येथील ढाकणे शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. संकुलांतर्गत कार्यरत सुनीताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (एमसीए) या पदव्युत्तर अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली, तसेच महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे.

ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये यापूर्वी डिप्लोमा अभियांत्रिकी, बी.टेक., एमबीए, आयटीआय, तसेच इयत्ता अकरावी-बारावी विज्ञान शाखेचे वर्ग सुरू आहेत. आता एमसीए अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर स्तरावरील माहिती-तंत्रज्ञान शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. मान्यतेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, सचिव जया रहाणे, कोषाध्यक्ष हृषिकेश ढाकणे, प्रा. रियाझखान आत्तार, प्रा. अंबादास डोंगरे, महेश मरकड, प्रवीण नागरगोजे यांनी अभिनंदन केले.
...............
एआयसीटीई व राज्य शासनाची मान्यता मिळणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, रोजगाराभिमुख आणि उद्योगकेंद्रित शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा यापुढेही प्रयत्न कायम राहील.
-डॉ. एकनाथ ढाकणे, संस्थापक अध्यक्ष, ढाकणे शैक्षणिक संकुल, राक्षी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer: थेट मंत्र्याशी नडणारा आयएएस अधिकारी! कोण आहेत जॉन किंग्जली? वाद थेट मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांपर्यंत

Success Story: भाड्याचे घर अन् 10 हजारांच्या पगारातून सुरुवात! मात्र आज तब्बल 400 कोटींच्या कंपनीचे मालक

Madhya Pradesh : लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता जमा; १.२५ कोटी महिलांच्या खात्यात १८३५ कोटी रुपयांची थेट मदत

Latest Marathi News Update : उरुळी कांचन येथे २३० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT