Medha Kulkarni sakal
पुणे

Medha Kulkarni : महिलांना सर्व क्षेत्रांत प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे ; अग्रवाल समाज फेडरेशनच्या महिला समितीचे पुरस्कार वितरण

आता वेळ बदलली असून विविध क्षेत्रांत महिला चमकदार कामगिरी करू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे,’’ असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. २३) येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘आता वेळ बदलली असून विविध क्षेत्रांत महिला चमकदार कामगिरी करू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे,’’ असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. २३) येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

अग्रवाल समाज फेडरेशनच्या महिला समितीतर्फे आयोजित माता माधवी अग्र गौरव पुरस्कार खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अभिनेत्री ईशा अग्रवाल, पंजाबी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या गुरमित कौर मान, अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शिवनारायण बंसल, सचिव के. एल. बन्सल, कोषाध्यक्ष श्याम गोयल, समितीच्या अध्यक्षा अनीता चंद्रशेखर अग्रवाल आदी उपस्थित होते.

कृष्णा प्रेमचंद मित्तल यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय बिमला बुलचंद गोयल, शोभा शिवकुमार गुप्ता, प्रकाशी सुभाष बंसल, नीती नरेन अग्रवाल, राहुल अग्रवाल, अलका नरेश जालान, बिमला वेदप्रकाश अग्रवाल, कृष्णा रामनिवास गोयल, गीता महेंद्र गोयल, पूजा रोहन गोयल, रजनी श्रीकिशन गोयल, सुनीता पवन बंसल, सुनीता राजेश गर्ग, शोभा सुरेश लोहिया, सुनीता सतीश बंसल, डॉ. चेतना मनीष अग्रवाल, आरती भूषण गुप्ता, पूनम सुरेंद्र गुप्ता, कोमल अग्रवाल, भाविका गुप्ता, कनक मित्तल, तानिया संदीप गुप्ता, नेहा राहुल बंसल-अग्रवाल आदींना अग्रवाल समाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृष्णकुमार गोयल यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT