पुणे

दूध भेसळप्रकरणी २४ जणांना अटक

CD

मंचर दूध भेसळप्रकरणी
आतापर्यंत २४ जणांना अटक

पोलिसांची माहिती; अनेक जिल्ह्यांत भेसळयुक्त दुधाचा पुरवठा

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केल्याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी आतापर्यंत २४ जणांना अटक केली आहे. भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी शॅम्पू, पामतेल, रसायने आणि ‘वे पावडर’चा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. २०२४ पासून या भेसळयुक्त दुधाचे वितरण केले जात होते, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मंचर परिसरात केलेल्या कारवाईत दूध भेसळीचे हे प्रकरण उघडकीस आले. अहिल्यानगर, सांगली, जालना आणि पुणे ग्रामीणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. भेसळयुक्त किंवा कृत्रिम दूध तयार करण्यासाठी पामतेल, पाणी आणि इतर रसायनांचा वापर केला जात होता. दुधातील तेल आणि पाण्याचे घटक एकत्र ठेवण्यासाठी ‘इमल्सीफायर’ या रसायनाचा वापर केला जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणातील संबंधित गोडाउनमधून भेसळीसाठी वापरले जाणारे विविध साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या २४ आरोपींचा वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे. यापूर्वी या प्रकरणात १० जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT