Suicide sakal
पुणे

Pune Crime : अल्पवयीन मुलीने मद्यपान करून संपविले जीवन; मैत्रीण बेशुद्धावस्थेत

मैत्रिणीबरोबर घरात मद्य पार्टी केल्यानंतर १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मैत्रिणीबरोबर घरात मद्य पार्टी केल्यानंतर १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला. आत्महत्या करणाऱ्या मुलीबरोबर असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत आणखी एक १६ वर्षीय मुलगी अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिषा येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. ती एका महाविद्यालयात अकरावीत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी (ता. १५) सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनिषाच्या घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाच्या मैत्रिणीने दूरध्वनी करून रात्री आठच्या सुमारास बोलावून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले.

तेव्हा तनिषाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तनिषाची मैत्रीणही बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले.

तिच्या आई-वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता तनिषा आणि मैत्रिणीने मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

तनिषाची मैत्रीण बेशुद्ध झाल्याने तनिषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, या बाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT