पुणे

पुणे - दुष्काळात चारा उपलब्धतेसाठी राज्यभर ‘मिशन मुरघास’ मोहीम

CD

चारा उपलब्धतेसाठी
‘मिशन मुरघास’ मोहीम

विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील ३०५ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात ‘मिशन मुरघास’ मोहीम राबविण्यात येत आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यात येणार आहे. यासाठी ७८ कोटी ४१ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
तर विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’ ही योजनादेखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी डॉ. पाटील म्हणाले, “दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर तसेच पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी २०२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी ४८ कोटी २० लाख रुपये आणि विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ३ कोटी रुपये, असा एकूण ५१ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्याच्या चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून आणखी ६६ कोटी ४१ लाख रुपये आणि विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत १० कोटी रुपये, असा एकूण ७६ कोटी ४१ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.”
या निधीतून सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे नियोजन आहे.

शास्त्रीय पद्धतीने मुरघास निर्मितीवर भर
‘मिशन मुरघास’अंतर्गत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान आणि स्मार्ट योजनेअंतर्गत मुरघास उत्पादक व विक्रेते यांच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना मुरघास निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चाऱ्याची योग्य वेळी कापणी करणे, कुट्टी करणे, दाबणी करून हवाबंद साठवणूक करणे, या प्रक्रियांचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दूध सहकारी संघ, दूध संकलन संस्था, महिला बचत गट, ग्राम संघ, शेतकरी उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्रे आणि ग्रामस्तरीय यंत्रणेच्या सहभागातून गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. मका, ज्वारी आणि नेपिअर यांसारख्या कमी कालावधीत तसेच तुलनेने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या चारा पिकांपासून मुरघास तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

१९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’ योजना
विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालकांसाठी ‘मागेल त्याला मुरघास’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्यातील आणि दुष्काळी परिस्थितीतील वैरणटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न असणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र पशुपालकांना प्रति जनावर प्रतिदिन ५ किलो मुरघास, ९० दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रति किलो ३ रुपये अनुदान देय आहे. संबंधित १९ जिल्ह्यांतील पात्र दूध उत्पादक शेतकरी व पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना
प्रत्येक जिल्ह्याने वैरण बियाणे वाटप, चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीची उद्दिष्टे निश्चित करून जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करावा. तसेच या मोहिमेला क्षेत्रीय स्तरावर प्राधान्य देऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला चाराटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासात रूपांतर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. यामुळे टंचाईच्या काळात जनावरांचे पोषण आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल. विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांनी ‘मागेल त्याला मुरघास’ योजनेचा लाभ घ्यावा. इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी https://vmddp.com/ या संकेतस्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
-----------

दुष्काळात चारा उपलब्धतेसाठी राज्यभर ‘मिशन मुरघास’ मोहीम
चारा निर्मितीसाठी ७६ कोटींचा अतिरिक्त निधी
विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे - राज्यातील ३०५ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीमवर पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात ‘मिशन मुरघास’ मोहीम राबविण्यात येत आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यात येणार आहे. यासाठी ७८ कोटी ४१ लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.

तर विदर्भ-मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’ ही योजना देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर तसेच पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सन २०२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी ४८ कोटी २० लाख रुपये आणि विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ३ कोटी रुपये, असा एकूण ५१ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्याच्या चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून आणखी ६६ कोटी ४१ लाख रुपये आणि विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत १० कोटी रुपये, असा एकूण ७६ कोटी ४१ लाथ रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या निधीतून सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात चारा लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
----
शास्त्रीय पद्धतीने मुरघास निर्मितीवर भर
‘मिशन मुरघास’अंतर्गत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान आणि स्मार्ट योजनेअंतर्गत मुरघास उत्पादक व विक्रेते यांच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना मुरघास निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चाऱ्याची योग्य वेळी कापणी करणे, कुट्टी करणे, दाबणी करून हवाबंद साठवणूक करणे या प्रक्रियांचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दूध सहकारी संघ, दूध संकलन संस्था, महिला बचत गट, ग्राम संघ, शेतकरी उत्पादक गट, कृषी विज्ञान केंद्रे आणि ग्रामस्तरीय यंत्रणेच्या सहभागातून गावोगावी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. मका, ज्वारी आणि नेपिअर यांसारख्या कमी कालावधीत तसेच तुलनेने कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या चारा पिकांपासून मुरघास तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
-----
१९ जिल्ह्यांत ‘मागेल त्याला मुरघास’ योजना
विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालकांसाठी ‘मागेल त्याला मुरघास’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. उन्हाळ्यातील आणि दुष्काळी परिस्थितीतील वैरण टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न असणार आहे.
----
या योजनेंतर्गत पात्र पशुपालकांना प्रति जनावर प्रतिदिन ५ किलो मुरघास, ९० दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रति किलो ३ रुपये अनुदान देय आहे. संबंधित १९ जिल्ह्यांतील पात्र दूध उत्पादक शेतकरी व पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मुरघास खरेदीचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
---
जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सुचना
प्रत्येक जिल्ह्याने वैरण बियाणे वाटप, चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीची उद्दिष्टे निश्चित करून जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करावा. तसेच, या मोहिमेला क्षेत्रीय स्तरावर प्राधान्य देऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
---
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला चारा टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासात रूपांतर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. यामुळे टंचाईच्या काळात जनावरांचे पोषण आणि दुग्धोत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल. विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमधील दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांनी ‘मागेल त्याला मुरघास’ योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी इच्छुक शेतकरी व पशुपालकांनी https://vmddp.com/ या संकेतस्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Crime : माजी महिला सरपंचासह सासऱ्यांना घरात घुसून मारलं; इचलकरंजीलगत असलेल्या गावात धक्कादायक घटना, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

India Farmer IDs: देशात ११ हजार किसान पहचान पत्रांचे वाटप; मुदतीच्या पाच महिने आधी उद्दिष्ट पूर्ण

रितेश आणि जिनिलिया देशमुख सहकुटुंब अजमेर शरीफ दर्ग्यावर; चादर, फुलंही चढवली; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी चकीत

'Vivo Y600' लवकरच होतोय लाँच! 10,000mAh बॅटरी अन् 50 MP कॅमेरा; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फोनच्या नावाची नोंद...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

SCROLL FOR NEXT