MNGL sakal
पुणे

एमएनजीएलच्या घरगुती पाईप्ड गॅसच्या किमतीत दोन रुपयांची दर कपात

नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने पीएनजीच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने पीएनजीच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.

पुणे - सीएनजीच्या दरात चार रुपयांचा कपात केल्यानंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या शहरी भागांतील गॅस वितरण कंपनीने आता घरगुती वापराच्या पाईप्ड गॅसच्या (पीएनजी) किरकोळ विक्री किमतीत दोन रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे पीएनजीचे दर ५१. ५० प्रति एससीएमवरून (स्टॅन्डड् क्यूबिक मीटर) ४९.५० प्रति एससीएम झाले आहेत. ही दरकपात बुधवारी (ता. १७) मध्यरात्रीपासून लागू होईल.

नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने पीएनजीच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. कमी झालेल्या गॅसच्या किमतीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एमएनजीएलकडून सांगण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण व तळेगाव या भागांत किमतीत कपात करण्यात आली आहे.

दर कमी केल्याने अनेक ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. शिवाय एलपीजी सिलिंडरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत सुमारे १६ टक्के बचत होईल. गेल्या काही दिवसांपासून सतत दरवाढीचे चटके सहन करीत असलेल्या सीएनजीच्या वापरकर्त्या वाहन चालकांना एमएनजीएलने मंगळवारी दिलासा दिला होता. कंपनीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजीचा दर चार रुपयांनी कमी करण्यात आला आहे. तर दुसऱ्याच दिवशी घरगुती वापराच्या पाईप्ड गॅसच्या किरकोळ विक्री किमतीत देखील कपात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Satej Patil : गोकुळमध्ये कोरमचा पेच सुटणार? गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी २५ संचालक एकत्र येतील; सतेज पाटलांना विश्वास

अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांना बॉम्बहल्ल्याची धमकी; दादरमधील चार शाळांनाही ईमेल, तपास सुरू

PM Kisan 24th Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा, 'या' दिवशी खात्यात येणार २००० रुपये; 'पीएम किसान' च्या हप्त्याची तारीख जाहीर

Marathi News Live Updates: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयंत पाटील मैदानात

Cybercrime: दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; पाच बँक कर्मचाऱ्यांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT