Mobile Theft Sakal
पुणे

Pune Theft : मोबाईल शॉपी शटरचे कुलूप तोडून ५२ लाखांचे मोबाईल चोरीला; चोरटे कॅमेऱ्यात कैद

कलाकृती हौसिंग सोसायटी, कर्वे रस्ता, कोथरूड या ठिकाणी शिंदे यांचे मोबाईलचे दुकान असून शनिवारी रात्री साडेदहा ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

समाधान काटे

पुणे - डहाणूकर कॉलनी, कोथरूड येथील कॅफे मोबाईल शॉपीच्या बंद शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून, जवळपास ५२ लाखांचे विविध कंपन्यांचे दोनशे मोबाईल व रोख रक्कम एक लाख साठ हजार रूपये चोरल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. याबाबत दुकानाचे मालक गौरव सुरेश शिंदे (वय-३१) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कलाकृती हौसिंग सोसायटी, कर्वे रस्ता, कोथरूड या ठिकाणी शिंदे यांचे मोबाईलचे दुकान असून शनिवारी रात्री साडेदहा ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता, तीन अज्ञात इसम पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीमधून खाली उतरतात, चेहरे दिसू नयेत म्हणून, काळ्या रंगाच्या टोप्या घातलेल्या दिसतात.

यातील एक इसम गाडीजवळ थांबतो व इतर दोघेजण शटर तोडून दुकानात प्रवेश करतात. एक- एक मोबाईल कॅरीबॅगमध्ये भरून, चारचाकी गाडीमध्ये कॅरीबॅग घेऊन पसार होताना दिसत आहेत.

घटनेची माहिती कळताच कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम, समीर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक बालाजी सानप पुढील तपास करीत आहेत. 'गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास सुरू आहे.

- वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, कोथरूड पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT