लोगो : मोहोळ तालुका
चुरशीने अन् शांततेत मतदान प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २३ : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. २३) चुरशीने मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात ७१.३२ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ८५.३४ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाचा वेग मंद होता; मात्र दुपारनंतर त्यात वाढ झाली. मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदान केंद्र दाखविणे आणि मतदारयादीतील क्रमांक शोधून देण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी मदत करत होते.
भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ येथे कुटुंबासमवेत, माजी आमदार यशवंत माने यांनी सावळेश्वर येथे, तर लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मोहोळ येथे मतदान केले.
दरम्यान, पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी प्रत्येक मतदान केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. माजी शिक्षक आमदार तथा या निवडणुकीतील उमेदवार दत्ता सावंत यांनीही मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला.
मतदानाची आकडेवारी
- शिक्षक मतदारसंघ : एकूण मतदार १,१८०; मतदान १,००७; टक्केवारी ८५.३४
- पदवीधर मतदारसंघ : एकूण मतदार ५,१०८; मतदान ३,६४३; टक्केवारी ७१.३२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.