पुणे

पश्चिम विदर्भात पावसाची ओढ; खरीप पिके संकटात २५ दिवसांपासून पावसाची उघाड

CD

पश्चिम विदर्भात पावसाची ओढ

खरीप पिके संकटात; २५ दिवसांपासून पावसाची उघाड

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : पश्चिम विदर्भात पावसाची ओढ वाढत चालल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत ३० जुलैला सार्वत्रिक स्वरूपाचा दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने दिलेली उघाड अद्यापही कायम आहे. जवळपास २५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून या भागात पाऊस नसल्याने फुल-शेंगावस्थेतील सोयाबीनसह कपाशी, मूग, उडीद, तूर व इतर खरीप पिकांना पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे.
पावसाची दीर्घ उघाड कायम राहिल्यास फुल-शेंगावस्थेतील सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कपाशी, मूग, उडीद, तूर तसेच अन्य खरीप पिकांनाही सध्या पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाच्या पुनरागमनाकडे लागले आहे. हवामान खात्याकडून पावसाबाबत वारंवार सूचना येत असल्या तरी पुरेसा पाऊस होत नसल्याने चिंता मिटलेली नाही.

अकोल्यात ६९.२ टक्केच पाऊस
अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात ८२.८ टक्के, तेल्हारा ९३.९ टक्के, बाळापूर ६४, पातूर ६०.३, बार्शीटाकळी ६४.६ आणि मूर्तिजापूर येथे ७४.९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची सरासरी ५३३.९ मिलिमीटर असून प्रत्यक्षात ३६९.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ६९.२ टक्के पाऊस झाला आहे.

वाशीममध्ये ७२.७ टक्के पाऊस
वाशीम तालुक्यात ७०.७ टक्के, रिसोड ७४.९, मालेगाव ८७.१, मंगरूळपीर ६९.७, मानोरा ८५.४ आणि कारंजा येथे ५७.८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६०० मिलिमीटर पाऊस होत असतो. या वर्षी प्रत्यक्षात ४३६.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या ७२.७ टक्के आहे. सुमारे २८ टक्के पाऊस कमी झालेला आहे.

बुलडाण्यात ८६.७ टक्के पाऊस
बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथे ११३.२ टक्के, संग्रामपूर ७२.८ टक्के, चिखली ७६.२, बुलडाणा ८४.२, देऊळगावराजा ८९, मेहकर ८५.९, सिंदखेडराजा ८५, लोणार ७३.१, खामगाव ८०.१, शेगाव ९९.९, मलकापूर ८५.२, मोताळा ९६.४ आणि नांदुरा येथे १०४.७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ४९८.८ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष ४३२.३ मिलिमिटर पाऊस झाला असून, त्याची टक्केवारी ८६.७ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT