पुणे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, मान्सून दाखल

नामदेव कुंभार

पुणेकरांसाठी दिलासादायक वृत्त आहे. आपेक्षेपेक्षा वेगानं मान्सूनची आगेकूच सुरु असून आज, रविवारी मान्सून पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती सकाळला दिली. मान्सूनची वेगाने आगेकूच सुरु असून अलिबागपर्यंत पोहोचला आहे, पुढे तो मध्य महाराष्ट्रात जाईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे तो वेगानं पुढे सरकत आहे, असं अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.

तीन तारखेला लक्षद्वीप दक्षिण केरळ आणि दक्षिण तमिळनाडूत मान्सून सक्रीय झाला होता. त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यातही मान्सून दाखल झाला. सोलापूर, सांगली, सातारा आणि पुण्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढे मध्य महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु आहे. वेगवान वाटचाल करत मान्सूनने शनिवारी महाराष्ट्रात धडक दिली. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या पाच दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात (Monsoon in Maharahstra 2021) दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाच्या वृत्ताने बळीराज सुखावला आहे.

जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देश व्यापेल

जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल.

देशात यंदा १०१ टक्के पाऊस

उत्तर-पश्चिम (वायव्य) भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प येथे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यान वर्तविला आहे दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजनुसार,२०२१ मध्ये देशात मॉन्सून हंगामात (जुन ते सप्टेंबर) सरासरीच्या १०१ % पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रशांत महासागरातील स्थिती जैसे थे (तटस्थ) राहणार असून इंडियन ओशन डायपोल (आयओडी) निगेटिव्ह राहणार असल्याच अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT