पुणे

संवाद

CD

मोशी येथील टोलनाक्याचे गतिरोधक हटवा
पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथील टोलनाका ऑक्टोबर २०२१ मध्ये बंद झाला आहे. मात्र, टोलनाका बंद होऊन सुमारे पाच वर्षे उलटूनही येथील मोठे गतिरोधक अद्याप हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या आकाराच्या गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग अचानक कमी करावा लागतो. परिणामी वाहनांच्या सस्पेन्शनसह खालच्या भागाचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच वारंवार वेग कमी-जास्त करावा लागत असल्याने इंधनाचा अपव्यय होतो. महामार्गावर अचानक वाहने धीम्या गतीने जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. टोलनाका बंद झाल्यानंतरही तेथील गतिरोधक आणि जुन्या टोलनाक्याचे स्ट्रक्चर कायम ठेवण्याचे कारण काय? संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन अनावश्यक गतिरोधक तसेच टोलनाक्याचे जुने स्ट्रक्चर हटवावे.
- विलास ढोकले, सांगवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC-JSSC परीक्षांवरून मोठा ट्विस्ट! भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय थांबवला; झारखंड सरकारला हायकोर्टाचा मोठा झटका

‘रात्री जेवणाचा प्रश्न असतो म्हणून तिचं कौतुक करतो’ अशोकमामा निवेदिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाले; 'मला संसारातलं...'

Manwat Accident: विरुद्ध दिशेने आलेल्या स्विफ्ट डिझायरची दुचाकीला जोरदार धडक; यशवंत मुळे ठार, भगवान निर्वळ गंभीर जखमी

Palghar Corruption: पालघर महावितरणचा वायरमन आठ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; जास्तीचे वीज बिल कमी करण्याचे आमिष

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

SCROLL FOR NEXT