पुणे

उच्चस्तरीय चौकशी समितीचा अंतरिम अहवाल शासनाकडे

CD

पिंपरी, ता. १८ : मोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै रोजी घडलेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तिचा अंतरिम अहवाल सोमवारी (ता. १७) राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दुर्घटनेची कारणमीमांसा, सुरक्षा नियमांचे पालन, प्रकल्पातील कार्यपद्धती आणि विविध यंत्रणांच्या प्राथमिक जबाबदारीबाबत समितीने निरीक्षणे नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाने दुर्घटनेनंतर स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती. समितीने घटनास्थळाची पाहणी, महापालिका अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. तसेच प्रकल्पाची मंजुरी, सुरक्षा परवानग्या, संरचनात्मक आराखडे आणि देखभाल नोंदींचीही तपासणी करण्यात आली. या सर्वांचा आधार घेत अंतरिम अहवाल शासनाला पाठवण्यात आला. यात जबाबदार व्यक्ती व संस्थांवर कारवाईबाबत स्पष्ट शिफारशी अपेक्षित आहेत.

समितीने या गोष्टींची केली छाननी
दुर्घटनेनंतर प्रकल्पाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संरचनात्मक स्थैर्याचे प्रमाणपत्र होते का, काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाय राबविले होते का, धोकादायक क्षेत्रात कामगारांना परवानगी कशी देण्यात आली, तसेच महापालिका आणि कंत्राटदार यांच्यातील देखरेखीची जबाबदारी नेमकी कोणाची होती, या मुद्द्यांची चौकशी समितीने छाननी केली आहे.

अंतिम अहवालाकडे लक्ष
अंतरिम अहवाल शासनाकडे पोहोचला असला, तरी अंतिम अहवालात दुर्घटनेची निश्चित कारणे, तांत्रिक त्रुटी, प्रशासकीय निष्काळजीपणा आणि जबाबदार अधिकारी-कंत्राटदारांविरुद्धच्या कारवाईबाबत ठोस शिफारशी असतील. त्यामुळे नऊ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचे उत्तर अंतिम अहवालातून स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी अभियंत्यांचा पदभार बदलला
या दुर्घटनेनंतर महापालिकेचे पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना सहा महिन्यांकरिता निलंबित करण्यात आले. त्यांचा पदभार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व कार्यकारी अभियंता सोहम निकम यांच्याकडे देण्यात आला. मात्र, सोमवारी कार्यकारी अभियंता सोहम निकम यांच्याकडील पदभार काढून पंकज धेंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पदभार बदलामुळेही महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT