tocilizumab
tocilizumab 
पुणे

कोरोनावरील एक लाखाच्या औषधाविषयी अमोल कोल्हे म्हणतात...

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : गंभीर व अतिगंभीर कोविड- १९ बाधित रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे Tocilizumab हे औषध परिणामकारक नसल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनात आढळून आल्याचे रोश फार्मा (Roche Pharma) या मूळ कंपनीनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे टास्क फोर्स व तज्ज्ञांमार्फत योग्य सूचना जारी करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोविड- १९ च्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी Tocilizumab हे औषध भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या सल्ल्यानुसार प्रमाणित व मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात Tocilizumab या औषधाचा सर्रास वापर वापर केला जात आहे. एकीकडे या औषधाची मागणी वाढल्याने मूळ ४० हजार रुपये इतकी किंमत असलेल्या या औषधाची एक लाख रुपये किमतीला विक्री होऊ लागली आहे.

तर, Tocilizumab औषधाची मूळ संशोधक असलेल्या रोश फार्मा (Roche Pharma) या कंपनीने २९ जुलैला आंतरराष्ट्रीय संशोधनात Tocilizumab हे औषध गंभीर अथवा अतिगंभीर रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून देत टास्क फोर्स व तज्ज्ञांमार्फत योग्य सूचना जारी करण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे. अशाप्रकारे मार्गदर्शक सूचना जारी केल्यास डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन मिळेल, शिवाय Tocilizumabचा सर्रास वापर थांबून काळ्या बाजारातील विक्रीला आळा बसेल, असे मतही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. 

कोविड-१९चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून डॉ. कोल्हे यांनी सातत्याने औषधांच्या किंमती व त्याच्या परिणामकारकते विषयी रुग्णांची फसवणूक होऊ नये, यासाठी दक्ष राहून राज्य व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना वेळोवेळी पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT