पुणे

जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले शेतकऱ्यांचे प्रश्‍न

CD

खासदार शिंदेंनी घेतली
जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सोलापूर, ता. १४ : जिल्ह्यातील आणि लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची शेतकरी शिष्टमंडळासह भेट घेतली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई, खरीप २०२३ मधील वंचित शेतकऱ्यांच्या मंजूर विमा रकमेचे वितरण तसेच सीना नदीमध्ये भीमा-कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत पीकविमा, पाणी आणि नुकसानभरपाईसारखे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आणि विमा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून ग्रामस्थ आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, सचिन गुंड, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, प्रवीण भोसले, अमोल सलवदे यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: सरकारी शाळांसाठी किती निधी? किती पदे रिक्त? अभिजीत दीपकेंनी शिक्षण मंत्र्यांना विचारले ६ सवाल, माहिती देण्याचे आवाहन

रेल्वेच्या चादरी घेऊन बाजारात फिरले अन् कॅमेऱ्यात कैद झाले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

IND vs SL 2nd Test: ध्रुव जुरेलची शतकी खेळी! भारताची पाचशे धावांच्या दिशेने वाटचाल; हार्दिक पांड्यानंतर असा पराक्रम करणारा पहिला

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रशियातील मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’! प्रेमाची नवी गोष्ट लवकरच, कोण आहे नायिका?

SCROLL FOR NEXT