corona1
corona1 
पुणे

मुळशीकरांचे कोरोनाच्या लढाईत 80 टक्के यश 

राजेंद्र मारणे

भुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 78 टक्के झाले आहे. तालुक्यात आढळलेल्या कोरोनाचे 734 रुग्णांपैकी 575 रूग्ण बरे झाले आहेत. 

पुणे व पिंपरी चिंचवड शहराला मुळशी तालुका जवळ आहे. तालुका आकाराने लहान असला, तरी रूग्ण सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे तालुक्यात हिंजवडी येथे विप्रो कंपनीने व आज कासारअंबेली येथील सैनिक शाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील कंपन्यांमधील कामगारांचो कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे कोविड सेंटरसाठी कंपन्यांनी मोठी मदत केली आहे. तसेच, नांदे येथील सिम्बायोसिस रूग्णालयात मुळशीतील रूग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. 

आळंदीत चोर पावलांनी वशिल्याचे माउली दर्शन
 
लाॅकडाउन उठल्यामुळे ग्रामस्थांचे शहरीकरण भागात गर्दीचे प्रमाण मोठे आहे. तसेच, एकाच कुटुंबात अनेक व्यक्ती सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर लगेच तपासणी व उपचार घेतले जात नाहीत. लक्षणे असलेली व क्वारंटाइन व्यक्ती कुटुंबात, समाजात फिरत असतात. त्यामुळे कोरोना फैलावत असून, रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. आज एका दिवसात 19 रूग्ण सापडले असून, आतापर्यंत तालुक्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT