मुंबई महापालिकेचे
सहायक आयुक्त पाटील फरार!
मुंबई, ता. १९ : अभिनेता जावेद जाफरी आणि कुटुंबीयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपात गुन्हे नोंद झालेले महालिकेचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर ऊर्फ महेश पाटील फरार असल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पाटील यांच्यासह प्रकरणातील अन्य तीन संशयित आरोपींचा शोध घेत आहोत. त्यांच्या शोधार्थ विशेष पथके नियुक्त केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी निशित पटेल याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २३ मेपर्यंत वाढ केली. वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणी गृहप्रकल्प सुरू करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक चणचण आहे. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास निवासी, व्यावसायिक गाळे कमी किमतीत मिळतील, भविष्यात त्या मालमत्तेची किंमत दुप्पट, तिप्पट होईल, असे प्रलोभन दाखवत सहाय्यक आयुक्त पाटील आणि अन्य आरोपींनी टप्प्याटप्प्याने १८ कोटी रुपये उकळले. या गुंतवणुकीसाठी पाटील यांनी घर, बंगला विकण्यास भाग पाडले, असा आरोप जावेद यांच्या पत्नी हबीबा यांनी केला आहे. हबीबा यांच्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने खार पोलिस ठाण्यात पाटील, पटेल, सागर मेहता आणि अन्य दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.