पुणे

मुंबईतील सर्व बीचेस तात्काळ स्वच्छ करा"; एमपीसीबी अध्यक्षांचे पालिकेला कडक निर्देश!

CD

मुंबईतील चाैपाट्या
तत्काळ स्वच्छ करा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर साचणारा कचरा, प्लॅस्टिक आणि नाल्यांतून समुद्रात मिसळणाऱ्या घाणीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला धारेवर धरले आहे. जुहू, गोराई, वर्सोवा, दादरसह सर्व समुद्रकिनाऱ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अतिरिक्त यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करा, असे कडक निर्देश एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले.
‘चाैपाटी स्वच्छता मोहिमे’चा सविस्तर आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. ​ बैठकीदरम्यान जुहू, गोराई, वर्सोवा, दादरसह मुंबई शहर व उपनगरांतील सर्वच समुद्रकिनाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील नाल्यांतून वाहून येणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश सिद्धेश कदम यांनी दिले. यावर तोडगा काढण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘द ओशन क्लीनअप’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत करार केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT