मुंबई, ता. २३ : राज्यात आज विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा एकूण पाच मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी दुपारनंतर मतदानाला वेग आला होता. पाचही मतदारसंघांत मिळून मतदारांनी १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद केले. या सर्व मतदारसंघांत मतमोजणी येत्या २७ ऑक्टोबरला होणार आहे.
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये प्रचारात अत्यंत चुरस पाहायला मिळाली. पुणे पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपकडून डॉ. स्मिता जाधव, तर महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव या रिंगणात होत्या. या मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेनेचे समर्थन मिळालेले सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद-मराठवाडा पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यासह एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते. नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्यासह एकूण ३८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांच्यासह एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. विविध पक्षांचे दिग्गज आणि अपक्ष उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे या ‘हायव्होल्टेज’ लढतींमध्ये बाजी कोण मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.