पुणे

रिक्षा, टॅक्सी भाडेवाडीला एमएमआरटीएची मंजुरी

CD

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीला एमएमआरटीएची मंजुरी मुंबईकरांचा प्रवास महागणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २१ : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) इंधनाच्या वाढत्या किमती व वाढलेल्या परिचालन खर्चाचा विचार करून रिक्षा, टॅक्सींच्या किमान भाड्यात वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. नव्या दरानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. हे दोन्ही दर पहिल्या १.५ किलोमीटर अंतरासाठी लागू असतील. अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिसूचना जारी झाल्यानंतर पुढील काही आठवड्यांत नवीन भाडेदर लागू होण्याची शक्यता आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांचा परिचालन खर्च वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाडेवाढ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रिक्षा, टॅक्सी संघटना अनेक महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी करीत होत्या. मे महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीचा दर ८६ रुपये प्रतिकिलो केल्यानंतर मुंबई रिक्षा मेन्स युनियनने प्रतिकिलोमीटर १.१२ रुपयांची वाढ मागितली होती. ही भाडेवाढ २०१७च्या बी. सी. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT