पुणे

मुंद्रा अमली पदार्थ

CD

मुंद्रा अमली पदार्थ तस्करीप्रकरणी
व्यावसायिकाच्या भावाला अटक
ईडीची कारवाई; पाच दिवसांची कोठडी
नवी दिल्ली, ता. २४ (पीटीआय) : गुजरातमधील मुंद्रा बंदरावर २०२१ मध्ये जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दिल्लीतील व्यावसायिकाच्या भावाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बानीतसिंग तलवार असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
बानीतसिंगला २३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्याला पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली, अशी माहिती तपास यंत्रणेने शनिवारी दिली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे सुरू आहे. अर्धवट प्रक्रिया केलेल्या पावडरमध्ये लपवून अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित अमली पदार्थ दिल्ली, पंजाब आणि हरियाना येथेही जप्त करण्यात आले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने अफगाणिस्तानातून आलेले २,९८८.२१ किलो हेरॉईन जप्त केले होते. बानीतचा भाऊ हरप्रीतसिंग तलवार याला यापूर्वी एनआयए आणि ईडीने अटक केली होती. या प्रकरणात एनआयएने सहा आरोपपत्रे दाखल केली आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि दुबई येथील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंध असल्याचा आरोप अनेकांवर आहे. विटायश कोसर उर्फ राजू दुबई हा या टोळीचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. या टोळीत पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट आणि अफगाण नागरिकही सहभागी असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. हरप्रीतला अटक झाल्यानंतरही बानीत त्याच्या नियंत्रणाखालील कंपन्यांचे कामकाज पाहत होता, असा आरोप ईडीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

दिवाळीनंतर चमकणार 'या' ३ राशींचे नशीब! बुधाची सरळ चाल ठरणार गेमचेंजर; हातात खेळणार अपार पैसा...

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT