Electric vehicle Electric vehicle
पुणे

Pune News : महापालिका अधिकाऱ्यांच्या दिमतीला ९४ ई-मोटारी घेणार भाडेकरारावर

पुणे महापालिकेने इलेक्ट्रिक मोटारीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारल्याने आता प्रशासकीय कामांसाठी ई-मोटारी घेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेने इलेक्ट्रिक मोटारीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारल्याने आता प्रशासकीय कामांसाठी ई-मोटारी घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांसाठी ९४ मोटारी पाच वर्षांच्या भाडेकरारावर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी पुढील पाच वर्षांत २७ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या ताफ्यात विविध प्रकारची १ हजार ७८ वाहने आहेत. त्यापैकी आठ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने आहेत, त्यांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढतो. त्यामुळे त्यांचा वापर बंद केला जातो. यामध्ये प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या ॲम्बेसिडर मोटारीचा समावेश आहे. त्याऐवजी आता ई-मोटार भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती, यात चिनू ट्रॅव्हल्स या एकमेव कंपनीने निविदा भरली होती.

पण एकच निविदा आल्यानंतर फेरनिविदा काढावी लागली, त्या वेळीही या प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नसल्याने चिनू ट्रॅव्हल्सच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात प्रशासनाने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा १८ टक्के जादा दराने ही निविदा भरण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित दर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले.

पण नवीन गाडी खरेदी, विमा, चार्जिंग स्टेशन उभारणी, जागेचे भाडे, बँकेचा हप्ता, चालकाचा पगार, देखभाल दुरुस्ती याचा खर्च पाच वर्षांसाठी २७ कोटी रुपये इतका दाखविण्यात आला आहे. ठेकेदाराने दर कमी न केल्याने ही रक्कम मान्य करण्यात आली. तसेच पुढील पाच वर्षे कोणतीही वाढ केली जाणार नाही, असेही नमूद केले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य करून तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आहे.

२४ एसयूव्ही मोटारी

महापालिका एकूण ९४ ई मोटारी घेणार आहे. त्यापैकी २४ या कॉम्पॅक्ट एसयूव्ही इव्ही या प्रकारातील आहेत. उर्वरित ७० या फोर मीटर सेदान आहेत. दरम्यान महापालिकेने ११० गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती, पण महापालिकेत सध्या नगरसेवक नसल्याने १६ गाड्या कमी करून निविदेची रक्कम २ कोटी २५ लाख रुपयांनी कमी झाली आहे.

खर्चासाठी तरतूद

ई मोटारींसाठी महापालिका पुढील पाच वर्षांत २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक वर्षासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. त्यासाठी ७२ ब या नियमाअंतर्गत स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT