murlidhar shingote 
पुणे

पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : दैनिक पुण्य नगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्रांचे संस्थापक शिवनेरी भूषण मुरलीधर (बाबा) अनंता शिंगोटे (वय ८४) यांचे आज (ता. ६) दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथे निधन झाले.

सर्व सामान्य शेतकरी ते वृत्तपत्र क्षेत्रातील एक महान व्यक्तीमत्व म्हणून मुरलीधर शिंगोटे हे परिचित होते. जुन्नर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून ते मुंबईला आले. सुरुवातीला वृत्तपत्र वितरणाची कामे केली. नंतर स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरु केली. अल्पावधीत त्यांनी आपले नाव मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठे केले.  त्यांनी सन 198 ते 90 च्या दशकात राज्यातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता.

वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी मिळालेल्या शिंगोटें बाबांनी आपलेही दैनिक असावे, या हेतूने सन 1999-2000 च्या दरम्यान पुण्यनगरी दैनिक सुरु केले. चौफेर, आपला वार्ताहर, हिंदमाता, कर्नाटक मल्ला ही दैनिके कोणतेही भांडवल पाठिशी नसताना फक्त वाचकांच्या जोरावर त्यांनी सुरु केली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा नियम त्यांनी अखेरपर्यंत पाळला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT