पुणे

क्रिकेट

CD

PNE26W20605
अहिल्यानगर ः फ्रेंड्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेला नगर चॅम्पियन्स संघ.

नगर चॅम्पियन्स संघाला विजेतेपद
फ्रेंड्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट लीग : सुनील आगरकरची शतकी खेळी
अहिल्यानगर, ता. २० : शहरात आयोजित फ्रेंड्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. वाकोडी येथील साईदीप क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या रंगतदार अंतिम लढतीत नगर चॅम्पियन्स संघाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट सिनियर्स संघावर २६ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत उत्कंठावर्धक सामने, दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींना मेजवानी मिळाली. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. निर्णायक क्षणी नगर चॅम्पियन्स संघाने सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत नगर चॅम्पियन्स संघाने २० षटकांत ६ बाद २१५ धावा केल्या. सुनील आगरकर यांनी तुफानी १३७ धावांची झंझावाती खेळी साकारत संघाच्या मोठ्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अहमदनगर डिस्ट्रिक्ट सिनियर्स संघाने चांगला प्रतिकार केला. मात्र, नगर चॅम्पियन्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला मोठी भागीदारी उभारू दिली नाही. त्यामुळे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सिनियर्स संघाला २० षटकांत ४ बाद १८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत पवार उपस्थित होते. यावेळी साईदीप क्रिकेट अकादमीचे संचालक संदीप घोडके यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भाऊ काकडे यांनी मानाचा किताब पटकावला, तर मालिकेत अष्टपैलू आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तेजस करमरकर यांना मालिकावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
-------------
सुनील आगरकर ठरला सामनावीर
अंतिम सामन्यातील तुफानी शतकी खेळीसाठी सुनील आगरकर यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी फलंदाजी केल्याबद्दल त्यांनाच उत्कृष्ट फलंदाज पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT