Tree
Tree 
पुणे

नाशिक फाट्याजवळील २४ वृक्षांचे पुनर्रोपण

सकाळवृत्तसेवा

पुणे - नाशिक फाट्याजवळ मेट्रो मार्गात येणाऱ्या २४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात महामेट्रोला नुकतेच यश आले आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून महामेट्रोने आतापर्यंत ४३० वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे. 

नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानकाचे काम करताना पिंपळ व रेन ट्री या एकमेकांत गुंफलेल्या झाडांचे पुनर्रोपन करावयाचे होते. या वृक्षांचा घेर सुमारे चार मीटर होता. ही दोन्ही झाडे सुमारे ३५ ते ४० वर्षे जुनी होती. या जोड वृक्षांचे अशक्‍यप्राय असलेले हे काम महा मेट्रोने विशेष प्रयत्न करून नुकतेच पूर्ण केले.

या जोड वृक्षाभोवती सुमारे ७ फूट खोल खोदकाम करून, जेसीबी व क्रेनद्वारे प्रथमत: या वृक्षांना वेगवेगळे करण्यात आले. हे काम सकाळी सहापासून रात्री १० पर्यंत पूर्ण झाले. या दोन्ही वृक्षांना एकमेकांपासून वेगळे करून कासारवाडी येथील जलनिःसारण प्रकल्पाच्या आवारात लावण्यात आले, असे महामेट्रोने कळवले आहे. तळजाई टेकडीवर आतापर्यंत एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. प्रत्येक वृक्षाला स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. त्या वृक्षांची देखभाल करण्यासाठी विशेष व्यवस्थाही महामेट्रोने केली आहे. स्वारगेट येथील पीएमपी डेपो येथे मेट्रोचे काम करताना आड येणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठीही महामेट्रोला परवानगी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT