पुणे

अटक टाळण्यासाठी संशयितांची गॅलरीतून उडी मारण्याची धमकी

CD

गॅलरीतून उडी मारण्याची धमकी;
फसवणुकीतील संशयिताला अटक
नाशिक, ता. १४ : अहिल्यानगर जिल्ह्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यासाठी गेलेल्या नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पथकाला त्याने गॅलरीतून उडी मारण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी त्याचे लक्ष विचलित करून त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री नाशिकरोड परिसरात हा प्रकार घडला.
सुनील शिरसाठ (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने पाथर्डी येथे पतसंस्था सुरू करून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत (एमपीआयडी) गुन्हा दाखल असून, शिरसाठ गेल्या काही महिन्यांपासून पसार होता. शिरसाठ नाशिकरोड परिसरात लपून बसल्याची माहिती पाथर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक शहर गुन्हेशाखेशी संपर्क साधला. त्यानुसार, गुन्हेशाखेच्या पथकाने रुद्र हाईट्समधील एका फ्लॅटवर छापा टाकला. त्या वेळी शिरसाठने गॅलरीत जाऊन अटकेचा प्रयत्न केल्यास खाली उडी मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिडी लावण्याचा प्रयत्न केला असता, शिरसाठने पुन्हा उडी मारण्याची धमकी दिली. अखेर पोलिसांनी त्याचे लक्ष विचलित करून त्याला ताब्यात घेतले. मध्यरात्री घटनास्थळी पोहोचलेल्या पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पालघरमध्ये कलर कंपनीला भीषण आग; केमिकलच्या भडक्याने आगीचा लोट

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT