पुणे

निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांचे पोलिस आयुक्तांसमवेत सायकलिंग

CD

PNE26W45907
सोलापूर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीत सहभागी पोलिस आयुक्त एम. राजकुमार व अन्य अधिकारी, अंमलदार.

निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांसमवेत
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांचे सायकलिंग
सोलापूर, ता. ३० : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेतून सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी (ता. ३०) ‘संडेज् ऑन सायकल रॅली’ पार पडली. यात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते.
सुट्टीच्या दिवशीदेखील शरीरासाठी काही वेळ द्यावा, या हेतूने ही सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांचाही सहभाग होता. या प्रसंगी पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, वृष्टी जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. रॅलीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, सुरेशकुमार चाटे आदी अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात पोलिस आयुक्तालयातून झाली. पुढे सात रस्ता, रंगभवन, पोलिस मुख्यालय, अशोक पोलिस चौकी, संत तुकाराम चौक, गुरुनानक चौकमार्गे पुन्हा पोलिस आयुक्तालय या मार्गाने १० किलोमीटर रॅली काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT