PM Narendra Modi Dehu Visit Sakal
पुणे

'पांडुरंगापेक्षा मोठा मोदींचा फोटो'; पंतप्रधानांचा देहू दौरा वादात

या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे वारकरी सांप्रदायाचा अपमान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

वैष्णवी कारंजकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणजे १४ जून रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी ते देहू इथल्या तुकाराम मंदिराला भेट देणार असून तिथल्या शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. मात्र त्या आधीच हा दौरा वादात अडकला आहे. मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक फलक लावण्यात आले आहेत. मात्र या पोस्टर्सवर पंतप्रधान मोदींचा फोटो विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोठा असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीका करत वारकरी सांप्रदायाचा अवमान केल्याची भावना व्यक्त केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये वरपे म्हणतात, "संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे. विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT