पुणे

नवरात्रोत्सवासाठी एकवीरा-वाघजाई देवी देवस्थाने सज्ज

CD

लोणावळा, ता. १० : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री एकवीरा देवी आणि खंडाळा येथील श्री वाघजाई देवी देवस्थानांसह विविध मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारपासून (ता. ११) सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी देवस्थान सज्ज झाली असून, भाविकांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरातील विविध मंडळांच्या वतीने घटस्थापना, देवीची प्रतिष्ठापना, भजन, कीर्तन, आरती तसेच रास-दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कोळी व आगरी समाजासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव-कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला (ता. ११) सकाळी देवीच्या गडावर घटस्थापना होणार आहे. नऊ दिवसांच्या उत्सवात ललितपंचमी, महालक्ष्मी पूजन, दुर्गाष्टमीचा उपवास, पारायण, भजन, कीर्तन आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महानवमीला (ता. २०) पहाटे देवीची विशेष आरती झाल्यानंतर होमाचा कार्यक्रम होणार आहे.
रायवूड येथे असंघटित कामगार संघटना आणि अमित गवळी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तुंगार्ली येथे जाखमाता देवी, नांगरगाव येथे नांगराई देवी आणि लोणावळ्यात शितळामाता देवीचा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. बंगाली बांधवांच्या वतीने रेल्वे इन्स्टिट्यूट आणि हुडको कॉलनी येथे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. विविध मंडळांनी रास-दांडियाच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे.

वाघजाई देवस्थानात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
कोकणासह मावळातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडाळा येथील श्री वाघजाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. श्री वाघजाई देवस्थान व नवरात्रोत्सव समितीच्या वतीने उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजता खंडाळा गावठाणातून वाघजाई मंदिरापर्यंत देवीच्या प्रतिमेची छबिना मिरवणूक आणि घटाची पालखी काढण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान देवस्थानच्या वतीने क्रीडापटू तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. होमहवन, दसऱ्यानिमित्त (ता. २०) शमीपूजन आणि छबिना मिरवणूक असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाच्याच्या किडन्या निकामी, हॉस्पिटलला जाताना मामाला पोलिसांनी उचललं; ३० वर्षे देशसेवा, कागदपत्रेही दाखवली

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका, मराठा समाज मुख्य प्रवाहातच; उच्च न्यायालयात नव्याने सुनावणी सुरू

RICH ZODIAC SIGNS: श्रीमंतीत खेळतात ‘या’ राशींचे लोक; मेहनतीला मिळते भाग्याची साथ, अचानक होतो मोठा धनलाभ!

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके यांच्या आजीच्या अंत्यविधीची तयारी सुरु

Abhijeet Dipke : सोबत विमानात काय घडलं? २.२१ मिनिटांचा थरारक व्हिडीओ

SCROLL FOR NEXT