पुणे

मांडवगण फराट्यात नवरात्र मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी

CD

मांडवगण फराटा, ता. २२ : येथील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीदरम्यान वर्गणीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास वाघेश्वर मंदिरासमोर घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका गटाने धक्काबुक्की, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे, तर दुसऱ्या गटाने कोयता आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, आकाश सुरेश खोमणे (वय २६, रा. मांडवगण फराटा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मिरवणूक सुरू असताना हरिओम खोमणे याने त्यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी मंडळातील काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने संबंधित व्यक्ती पुन्हा मिरवणुकीत आल्या आणि धक्काबुक्की करू लागल्या. त्या वेळी हरिओम खोमणे याने कमरेचा चाकू काढून धाव घेतली. या गोंधळात अनिल ऊर्फ आकाश दादा जाधव यांना मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्ता खोमणे, सुनील खोमणे, गोरख खोमणे, हरिओम खोमणे, हरी खोमणे आणि कृष्णा खोमणे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
दुसऱ्या गटातील सुनील शिवाजी खोमणे (वय ४१, रा. मांडवगण फराटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा हरिओम, पुतणे हरी व कृष्णा यांना शुभम खोमणे याने देवीच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी बोलावले होते. मात्र, मिरवणुकीत आल्यानंतर वर्गणी दिली नसल्याचे कारण सांगून त्यांना नाचण्यास विरोध करण्यात आला आणि मिरवणुकीतून बाहेर ढकलल्यानंतर वाद वाढला. आकाश खोमणे, योगेश खोमणे, संदेश भंडलकर यांच्यासह अन्य व्यक्तींनी मुलगा व पुतण्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे सुनील खोमणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अनिल दादा जाधव हा मासे कापण्याचा कोयता घेऊन आल्याचा, तर अजय ऊर्फ चंद्रकांत खोमणे याने कुऱ्हाड उलटी धरून तिच्या दांड्याने हरिओमच्या पायावर मारल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश खोमणे, योगेश खोमणे, संदेश भंडलकर, सुयोग खोमणे, प्रमोद भंडलकर, आनंद खोमणे, मारुती खोमणे, अजय ऊर्फ चंद्रकांत खोमणे, श्रीकांत खोमणे, शेखर खोमणे, अनिल जाधव, विशाल जेजुरकर आणि समीर खोमणे या एकूण १३ जणांविरोधात सुनील खोमणे यांनी तक्रार दिली आहे. दोन्ही गटांतील जखमींनी मांडवगण फराटा येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रारी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस हवालदार एस. पी. खबाले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid : अवैध स्त्रीबीज खरेदी-विक्री रॅकेटप्रकरणी बारामती, ठाणे आणि नाशिकमध्ये ईडीचे छापे; २९ लाखांची रोकड जप्त

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT