NCP MLA Rohit Pawar on strike at Mahatma Phule Wada against contract recruitment examination scams esakal
पुणे

Pune News : कंत्राटी पदभरती, परीक्षेतील घोटाळे या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण

सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारतर्फे कंत्राटी पदभरती, परीक्षेतील घोटाळे याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले वाड्यात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. जी काही सरकारी भरती होत आहे त्यातही प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. परीक्षा फी च्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुटून आपली तिजोरी भरत आहे.

शिक्षणाचे खाजगीकरण, स्पर्धा परीक्षा, नोकर भरती, पेपर फुटी आणि कंत्राटीकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांच्या कष्टकरी युवक संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवती अध्यक्षा सुषमा सातपुते, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, दीपक कामठे, शिल्पा भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

"आता मी सिंगल पण आधी.." ब्रेकअपबद्दल रिंकूचा पहिल्यांदाच खुलासा ; "रिलेशनशिपची मला भीती वाटते.."

Surya Grahan 2026: फाल्गुन अमावस्या खास ठरणार! भारतात सूतक नसल्याने ‘या’ शुभ गोष्टी नक्की करा

SCROLL FOR NEXT