corporation sakal
पुणे

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भूमिका पुन्हा बदलली

अन् ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा ठराव पडला लांबणीवर

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : शहरातील २७० ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रस्तावाला पुन्हा विरोध करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) गुरुवारी घेतला. या ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी घेतला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेची (pune corporation) सर्वसाधारण सभा तहकूब झाली आणि ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव लांबणीवर पडला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी सायंकाळी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन ॲमेनिटी स्पेसचा आराखडा करणार आणि ३३ टक्के जागा अर्बन स्पेससाठी राखीव ठेवणार, या उपसूचनांच्या बदल्यात ठरावाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अचानक भूमिका बदलल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही खदखद निर्माण झाली.

हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापर्यंत गेला. त्यांनी ‘तुम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन भूमिका निश्चित करा,’ असे सांगितले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत बैठक झाली. त्यात बहुसंख्य नगरसेवकांनी ठरावाला विरोध करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार पक्षाने ठरावाला विरोध करण्याचे जाहीर केले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज दुपारी तीन वाजता सुरू झाले. परंतु, कल्याणसिंह, डॉ. गेल ऑम्वेट, शरद महाजन यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे ॲमेनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्याचा आणि स्वारगेट- कात्रज भुयारी मेट्रोला मंजूरी देण्याचा ठराव लांबणीवर पडला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा भूमिका बदलल्यामुळे ठराव लांबणीवर पडला, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे. भाजपने महापालिकेत बहुमतच्या जोरावर ठराव मंजूर करून घेतला असता तरी, राज्य सरकारने तो अडविला असता. त्यामुळे या ठरावाबाबत पुन्हा सहमती करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT