Sharad Pawar sakal
पुणे

कोजागिरीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसाठी करणार प्रार्थना

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जीवनातील एक हजारावी पौर्णिमा यंदा असेल. ही शरद म्हणजेच कोजिगीरी पौर्णिमा आहे, याचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगळवारी (ता. 19) प्रार्थना करणार आहेत. बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी आज या बाबत माहिती दिली.

शरद पवार यंदा 81 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही त्यांच्या जीवनातील एक हजारावी पौर्णिमा असणार आहे. हे औचित्य साधून कार्यकर्त्यांकडून प्रार्थना, नमाजपठण, होमहवन, अभिषेक केले जाणार आहे. शरद पवार यांच्या जीवनातील हा योग ख-या अर्थाने दुग्धशर्करा योग असेल, त्या मुळे या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्य व आरोग्यासाठी कार्यकर्ते हा उपक्रम राबविला जाणार आहे.

दरम्यान कार्यकर्त्यांकडून एक हजाराव्या पौर्णिमेनिमित्त गरजूंना एक हजार वस्तू असलेली कीट गरजूंना वाटप करुन विधायक उपक्रम राबविण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या किटमध्ये कपडे, वस्तू, पुस्तके, जीवनावश्यक वस्तू यांचा समावेश असावा असेही सुचविण्यात आले आहे.

दरवर्षी 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, यंदा मात्र कोजागिरीचे औचित्य साधून प्रथमच एक वेगळा उपक्रम राष्ट्रवादी राबविणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; खलील शेख प्रकरणात मोठी कारवाई

Nagpur News : रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना ‘रामरक्षा’ आठवली! निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य, विश्वास नांगरे पाटील यांचे थेट आदेश

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

SCROLL FOR NEXT