पुणे

राष्ट्रवादीत विधानसभा इच्छुकांचा 'ऑनलाइन' घोळ

उत्तम कुटे

पिंपरी : पुणे जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या अनेक विधानसभेच्या इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात अनेक प्रबळ व भावी उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज दिल्याने या मातब्बरांचा जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या इच्छुकांच्या यादीत समावेश नसल्याने गोंधळ झाला आहे. त्यातून या दावेदारांच्या समर्थकांत संभ्रम पसरला आहे. 

मावळमधील राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार बापूसाहेब भेगडे व खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील मातब्बर इच्छुक आणि माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आदींनी ऑनलाईन अर्ज दिले आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जाहीर केलेल्या यादीत समावेश नाही. परिणामी, त्यांच्या समर्थकांत काहीसे गोंधळाचे वातावरण पसरलेले आहे. मात्र, स्वत: त्यांनीच त्याबाबत खुलासा केल्याने हा संभ्रम आता संपणार आहे. दरम्यान, गारटकर यांनीही या ऑनलाईन घोळाला दुजोरा दिला. जिल्ह्यातून किमान आठ-दहा जणांनी ऑनलाईन अर्ज केले असावेत. त्यांची माहिती आज संध्याकाळपर्यंत उपलब्ध होईल. परिणामी, जिल्ह्यातील एकूण इच्छुकांची संख्या वाढेल, असे ते 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

ऑनलाईनखेरीज काहींनी जिल्हाध्यक्षांऐवजी थेट मुंबईत पक्षश्रेष्ठींकडेच इच्छुक म्हणून दावेदारी दाखल केलेली आहे. त्यामुळे त्यांचेही नाव संबंधित जिल्हाध्यक्षांच्या यादीत नाही. परिणामी त्यांचेही समर्थक तूर्त गोंधळून गेले आहेत, असे शिरूरचे तगडे दावेदार मंगलदास बांदल यांच्याबाबतीत घडले आहे. खुद्द पवारसाहेबांनीच शब्द दिल्याने विधानसभा लढणार नाही, असे होणारच नाही, असे त्यांनी सरकारनामाला सांगितले. मी व पत्नी अशा दोघांनीही इच्छुक म्हणून पक्ष श्रेष्ठींकडे मुंबईत अर्ज दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT