पुणे

बेपत्ता नातेवाइकांच्या शोधासाठी रुग्णालयांबाहेर गर्दी

CD

नातेवाइकांच्या शोधासाठी
रुग्णालयांबाहेर गर्दी
काठमांडू, ता. २७, (पीटीआय) : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूरात बेपत्ता झालेल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी शेकडो नागरिकांनी रुग्णालयांबाहेर गर्दी केली. दरम्यान, बचाव पथकांकडून नदीकाठ आणि नदीच्या खालच्या भागात बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.
बुधवारी रसुवा आणि मध्य नेपाळमधील अन्य भागांना पुराचा तडाखा बसल्यानंतर भोटेकोशी आणि त्रिशूली नदीतून पुराचे पाणी पुढे नारायणी नदीच्या दिशेने गेले. त्यामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत.
काठमांडूतील महाराजगंज येथील त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयाबाहेर बेपत्ता नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी मोठी गर्दी झाली. रुग्णालयात असलेल्या नागरिकांची नावे प्रशासनाने प्रसिद्ध केली आहेत. तसेच मृतांची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. बेपत्ता व्यक्तींची नावे आणि इतर माहिती नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळच्या माहितीनुसार, त्रिभुवन विद्यापीठ रुग्णालयात पुरामुळे जखमी झालेल्या २० जणांवर उपचार सुरू होते. नुवाकोटमधील त्रिशूली रुग्णालय आणि काठमांडूतील वीर रुग्णालयातही जखमींवर उपचार सुरू आहेत. चितवनमधील भरतपूर रुग्णालयातही बेपत्ता नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. त्रिशूली आणि नारायणी नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याने रुग्णालयातील शवागारावरही ताण आला आहे. शेजारच्या तनहून जिल्ह्यात सापडलेले नऊ मृतदेह शवागारात जागा नसल्याने परत पाठविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या पुरामुळे आरोग्य यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे. रसुवा येथील तिमुरे आरोग्य चौकी, स्याफ्रुबेसी आरोग्य चौकी आणि रसुवागढी मदत केंद्र या तीन आरोग्य सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT