पुणे

मोटारीला कट मारल्यावरून मारहाण

CD

न्हावरे, ता. १७ : न्हावरे (ता. शिरूर) येथील न्हावरे-गुणाट रस्त्यावर स्विफ्ट कारला कट मारल्याचा जाब विचारल्याने स्कॉर्पिओमधील तरुणांनी दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. पिस्तुलाची धमकी देऊन कारच्या काचा फोडल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रवी पंढरीनाथ बिडगर, आत्माराम पंढरीनाथ बिडगर (दोघेही रा. न्हावरे, ता. शिरूर) व एका अल्पवयीन मुलासह तीन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत नारायण वाघमारे (वय २७, रा. गुणाट, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास प्रशांत वाघमारे व त्यांचे चुलत भाऊ अभिजित प्रकाश वाघमारे स्विफ्ट कारमधून (क्र. एमएच १२, टी.एस. २९४३) न्हावरे येथे जात होते. न्हावरे-गुणाट रस्त्यावर आप्पा खेडकर यांच्या घराजवळ १९९६ क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओने वाघमारे यांच्या कारला कट मारला. याचा जाब विचारला असता, स्कॉर्पिओ चालकाने शिवीगाळ केली. गाडीतील अल्पवयीन मुलाने “माझ्याकडे पिस्तूल आहे, मी गुन्हेगार आहे, तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकीन!” अशी धमकी दिली. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून सर्वांनी प्रशांत व अभिजित यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कारच्या काचा फोडून नुकसान केले. पुढील तपास न्हावरे पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT