Pune ISIS Module Case 
पुणे

Pune ISIS Module Case : NIAची मोठी कारवाई! पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात आठव्या संशयित दहशतवाद्याला अटक

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता

रोहित कणसे

पुणे : पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएने आठव्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.आरोपी दहशतवादी संघटनेच्या कारवायांना प्रोत्साहन देण्यात सक्रिय सहभागी असल्याचे समोर आले आहे. महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, कटकमसंडी, हजारीबाग, झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. शाहनवाझने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोध घेतला होता. तसेच, त्याने गोळीबार आणि स्फोट घडवून आणण्याबाबत आयोजित प्रशिक्षण शिबिरांमध्ये सक्रिय भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष बाब म्हणजे, कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी त्याला महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी यांच्यासह दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले होते.त्यानंतर तो कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

त्यानंतर आरोपी इसिस दहशतवादी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समोर आले.एनआयएने त्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या आरोपींनी इसिस दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा कट रचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT