Priya Joshi Sakal
पुणे

मुक्या जीवांना मायेचा हात

नागपूरमधील प्रिया जोशी बऱ्याच वर्षांपासून परिसरातील मोकाट कुत्र्यांना खाणं देतात. स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या पोळ्या व भात, हे ताजं अन्न त्या दररोज भटक्या कुत्र्यांना पुरवतात.

नीला शर्मा

नागपूरमधील प्रिया जोशी बऱ्याच वर्षांपासून परिसरातील मोकाट कुत्र्यांना खाणं देतात. स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या पोळ्या व भात, हे ताजं अन्न त्या दररोज भटक्या कुत्र्यांना पुरवतात. जखमी कुत्री, मांजरी व पक्षी दिसताच त्यांच्यावर उपचारांसाठी त्या पशुवैद्यकांकडे धाव घेतात. जखमी किंवा आजारी मुके जीव बरे होईपर्यंत आपल्या घरात ठेवून त्यांची शुश्रूषा त्या करतात.

ओळखीतल्या कुणाला

कुत्र्या, मांजराची बेवारस पिलं दिसली की, लगेच प्रियाताईंना कळवलं जातं. त्या म्हणाल्या, ‘बेवारस सापडलेल्या कुत्री, मांजरीच्या पिलांसाठी आमच्या घरी दुधाच्या अनेक बाटल्या असतात. पिलं थोडी मोठी होऊ लागताच त्यांच्यासाठीचं विशिष्ट खाद्यं डॉक्टरांच्या सल्ल्याने मी देते. मकर संक्रांतीच्या आसपासच्या दिवसांत भरपूर पक्षी पतंगाच्या मांज्याने जखमी होतात. माहिती मिळताच मी त्यांना आधी पशुवैद्यकांकडे नेऊन मग घरी आणते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले सहा पिंजरेही कधी कधी कमी पडतात. बरे झालेल्या पक्ष्यांना मी निसर्गात पुन्हा सोडते.’

प्रियंकाताईंनी असंही सांगितलं की, भटक्या कुत्र्यांची अथवा मांजरींची पिलं मोठी होईपर्यंत सांभाळते. दरम्यान त्यांना मायेने वाढवू शकणाऱ्यांचा शोध घेते. अशी अनेक पिलं दत्तक दिली आहेत. विदेशी प्रजातींच्या पिलांऐवजी स्थानिक पातळीवर सापडलेली पिलं दत्तक घेतली जावीत, यासाठी लोकांना समजावून सांगते. रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांना अन्नच मिळालं नाही किंवा मिळाल्यास ते पुरेसं मिळालं नाही, असे प्रसंग बरेचदा येतात. हे प्राणीही निसर्गातील घटक आहेत. अन्नपाण्यावाचून ते मरण पावतात. उपाशी राहिल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना रोग जडू शकतात. हे लक्षात घेऊन मी दररोज शंभर मोकाट कुत्र्यांसाठी स्वतः भात रांधते. चपात्या तयार करते. चपातीवर भात ठेवून देते.

प्राण्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटू लागल्यावर पशुवैद्यकांकडे नेऊन त्यांना रोगप्रतिबंधक लस व नसबंदीची व्यवस्था करते. शस्त्रक्रियेनंतर एखाद दिवस माझ्या घरी ठेवते. परिसरातील शाळकरी मुलांची मैत्री त्यांच्या जवळपासच्या भागातील भटक्या कुत्र्यांशी व्हावी, यासाठी प्रयत्न करते. नवीन पिढीची संवेदनशीलता वाढावी, हीच तळमळ आहे.

- प्रिया जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: प्रवाशांना माेठा दिलासा! लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावर दुसरी मार्गिका सुरू; डेक्कन क्वीन आजपासून धावणार

Nagpur News: एसटी प्रवाशांना दिलासा नाही! साध्या बसच्या 10% भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, 1 ऑगस्टपासून पूर्वीचे दर

Latest Marathi News Live Update : 'पुणे ग्रँड टूर'साठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार; 137 कोटींच्या खर्चाला मान्यता

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

SCROLL FOR NEXT