पुणे

आम्हालाही अन्नदान करायचे पण...

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार : लॉकडाऊन काळात परराज्यातील अडकलेल्या कामगार, केटरिंग, हॉटेल कामगार तसेच बेघर गरजवंतांना खडकीतील समस्त खडकीकर गणेशभक्त सेवा समिती, मनीष आनंद हेल्पलाइन, रॉबिनहूड ग्रुप आदींच्या वतीने खडकी, बोपोडी, दापोडी, रेंजहिल, वाकडेवाडी परिसरात सकाळ आणि संध्याकाळ अन्नदान पोहोचवण्यात येत आहे. मात्र, ही सेवा पुरवणाऱ्या वंदे मातरम् संघटना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता पोलिस जागोजागी अडवत आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाकडून अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येणाऱ्या पासची विचारणा होत आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी पास मिळवण्यासाठी लिंक ओपन करून माहिती भरल्यानंतर ही सबमिट होत नसल्याने पास मिळत नाही. त्यामुळे पोलिस गाडी जप्तीची कारवाई करून गुन्हा दाखल करतील, या भीतीपोटी कार्यकर्ते आता अन्नदान गोरगरिबांपर्यंत पोचवण्यासाठी पुढे येत नाहीत.

परिणामी, खडकीतून अन्नदान करण्याची सेवा आपोआप बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दानशूर व्यक्ती १४ एप्रिलपर्यंत अन्नदान देण्यासाठी तयार आहेत. मात्र, पोलिसांच्या भीतीपोटी कार्यकर्त्यांपुढे पेच पडला आहे. स्थानिक खडकी पोलिस ठाण्यातून अन्नदान पोचवण्याकरीता पोलिस निरीक्षकांकडून कार्यकर्त्यांना पास मिळावे, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर यांना अटक होणार? आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल, बिहार पोलीस करणार चौकशी

K Annamalai: अन्नामलाईंचा भाजपला रामराम! नव्या पक्षाची घोषणा; तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ, पक्षाची प्रतिक्रिया समोर

Mumbai Crime: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, महिलेची १५ लाखांना फसवणूक

Google चा मोठा धमाका! आता YouTube-Instagram वरचा तुमचा प्रत्येक Video-Post लाखो लोकांना दिसणार? क्रिएटर्ससाठी आली गेमचेंजर सुविधा

IND vs AFG: रिषभ पंतला कसोटी उपकर्णधारपद काढून घेतल्यानंतर गौतम गंभीरची वॉर्निंग; म्हणाला, 'त्याने बदलण्याची गरज नाही, पण...'

SCROLL FOR NEXT