Now RTO will give digital pass during lockdown 
पुणे

आता 'आरटीओ' ही देणार डिजीटल पास; तेही फक्त अर्ध्या तासांत

सकाळवृत्तसेवा

पुणे : अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या वाहनांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही (आरटीओ) डिजीटल (ई- पास) देण्यास शनिवारपासून सुरवात झाली आहे. ही सेवा अहोरात्र सुरू राहणार असून किमान अर्ध्या तासात चालकांना हे पास ऑनलाईन पद्धतीने मिळतील.

पोलिसांच्या धर्तीवर हे पास (क्यूआर कोड) उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने या बाबत शुक्रवारी रात्री आदेश दिल्यावर शनिवारपासून पास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे पास हवे असल्यास त्यांनी https://transport.maharashta.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. त्यात ई- पास, या विभागावर क्लिक करायचे आहे. तेथे एमएच- 12 (पुणे) हा विभाग निवडल्यावर अर्ज उपलब्ध होईल. त्यावर वाहन मालकाचे नाव, चालकाचे नाव, लायसन व मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, वाहनाचा प्रकार, रूट, मालाचा प्रकार आदी तपशील भरायचा आहे. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर पास तयार होईल आणि संबंधितांना तो पीडीएफद्वारे ई- मेलवर पाठविला जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. 

24 तास प्रक्रिया सुरु
पास देण्याची प्रक्रिया 24 तास सुरु असेल. त्यासाठी 3 शिफ्टमध्ये मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या 6 दिवसांत 'आरटीओ'ने 584 पास दिले आहेत. त्यांनी डिजीटल पाससाठी पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही, असेही भोर यांनी स्पष्ट केले आहे. 
                    
अधिक माहितीसाठी नागरिकांना 'आरटीओ'मध्ये  20-26058090 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा  Email -rto.12-mh@gov.in या ई- मेल आयडी वर संपर्क साधता येईल, अशी माहिती भोर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT