omkar kapre gang kidnapped and killed child pune crime police action sakal
पुणे

Pune Crime : मुलाचे अपहरण करुन खून करणाऱ्या ओंकार कापरे टोळीवर मोका

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलाचा शोध घेतला. त्यावेळी बेपत्ता मुलाचा मृतदेह दिवेघाटाजवळ आढळून आला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याचा खून करणाऱ्या ओंकार चंद्रशेखर कापरे याच्यासह टोळीतील इतर दहा साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांन्वये कारवाई केली.

फिर्यादी यांचा १६ वर्षीय मुलगा दोन सप्टेंबर रोजी रात्री कोंढवा खुर्द येथील ढोलपथकात सरावासाठी गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी कोंढवा पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलाचा शोध घेतला. त्यावेळी बेपत्ता मुलाचा मृतदेह दिवेघाटाजवळ आढळून आला होता.

नील खवळे याला आमची टीप देतो या कारणावरुन आरोपींनी मुलाचे कोंढव्यामधून मोटारीतून अपहरण केले. मंतरवाडीजवळ लाकडी दांडक्याने मारहाण करून मुलाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी टोळी प्रमुख ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २७, रा. कोंढवा खुर्द), साईराज राणाप्रताप लोणकर (वय २३, रा. उंड्री), प्रणय सुनील पवार (वय १९), सौरभ ऊर्फ दत्ता माणिक तायडे (वय १८), कृष्णा प्रकाश जोगदंडे (वय २०), महादेव ऊर्फ पप्पू गोविंद गजाकोष (वय १९), रोहन अनिल गवळी (वय २१, सर्व रा. कोंढवा खुर्द) यांना अटक केली.

दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, राज ठोंबरे आणि अमन (पूर्ण नाव नाही) हे फरार आहेत. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव दिला होता. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT