पुणे

एक गाय, एक लाख लिटर दूध उत्पादनाचे तंत्र

CD

मंचर, ता. १३ : दुग्धव्यवसाय अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या उद्देशाने प्रोग्रेसिव्ह ब्रीडर्स फार्मर्स असोसिएशन (पीबीएफए), पुणे जिल्हा यांच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजित ‘एक गाय, एक लाख लिटर दूध उत्पादन तंत्रज्ञान’ या मिशन प्रॉफिट कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. शैलेश मदने यांनी दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, गायींचे दूध उत्पादन वाढविण्याचे शास्त्रीय उपाय आणि उत्पादन खर्च कमी करून नफा वाढविण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. योग्य तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास दुग्धव्यवसाय अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. रामनाथ वदक यांनी प्रोग्रेसिव्ह ब्रीडर्स फार्मर्स असोसिएशनच्या कार्याची आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी संघटित होऊन आधुनिक दुग्धव्यवसायाची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. नागनाथ पुरी यांनी दुग्धव्यवसायासाठी उपलब्ध विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचे लाभ, अर्ज प्रक्रिया आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. दुग्धव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, दूध उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न उंचावणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील दुग्धव्यवसायाला शास्त्रीय दृष्टिकोन आणि व्यावसायिकतेची नवी दिशा मिळेल, असा विश्वास आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. मदने व डॉ. पुरी यांनी समर्पक उत्तरे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT