Accident Sakal
पुणे

भरधाव मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

भरधाव मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

भरधाव मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाले.

उंड्री - भरधाव मिक्सर ट्रकच्या (Mixer Truck) धडकेत दुचाकीवरील (Two Wheeler) एकाचा मृत्यू (Death) झाला असून, एकजण जखमी (Injured) झाले. हडपसर उड्डाण पुलावर २५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

रवींद्र विमण्णा कोळी (रा. ट्युडुस सोसायटी, मांजरी फार्म, सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. सुरेश शिवाजी रायते (वय २३, रा. लोणकर हॉलशेजारी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, राहुल ताटे (वय २८, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे दाजी हडपसरहून २५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मावस बहिणीला मोटारसायकलवरून घेऊन जात होते. त्यावेळी हडपसर उड्डाण पुलावर भरधाव मिक्सरच्या ट्रकची दुचाकीस धडक बसून अपघात झाला. या अपघातात रवींद्र विमण्णा कोळी यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर मावस बहीण जखमी झाली आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT