Fataka Stall sakal
पुणे

Fataka Stall : फटाके स्टॉलसाठी ऑनलाइन निविदा

पुणे महापालिकेतर्फे यंदापासून फटाका स्टॉलच्या जागा भाड्याने देण्यासाठी ऑनलाइन लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेतर्फे यंदापासून फटाका स्टॉलच्या जागा भाड्याने देण्यासाठी ऑनलाइन लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १२ ठिकाणी जागा १६३ स्टॉलसाठी जागा निश्‍चित केल्या आहेत. ३० ऑक्टोबर रोजी हे लिलाव होणार आहेत. दरम्यान, ऑफलाइन लिलावात स्थानिक पुढाऱ्यांच्या दादागिरीमुळे अनेकांना इच्छा अरूनही स्पर्धेतून बाहेर होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने फटाके विक्रीसाठी पुणे महापालिकेतर्फे व्यावसायिकांना वर्तक बागेच्या शेजारी नदी काठच्या रस्त्यावर स्टॉल लावले लावण्यासाठी भाड्याने जागा दिली जाते. गेल्यावर्षी येथे ३५ स्टॉलसाठी लिलाव आयोजित केला होता. त्यामध्ये ६६ जणांनी अर्ज केले होते.

लिलाव सुरु झाल्यानंतर स्थानिक पुढाऱ्यांनी दादागिरी करत अनेकांना बोलू लावण्यापासून रोखले होते. त्यावरून गोंधळही झाला होता, त्याचवेळी काही जणांनी या जागांसाठी ऑनलाइन बोली लावावी अशी मागणी केली होती. त्यानुसार वर्तक बागेसह कोंढवा, हडपसर, धानोरी, कोथरूड, पर्वती, कात्रज, धायरी, कल्याणीनगर, खराडी, बालेवाडी, हडपसर येथे फटाका स्टॉल असतील. यांची एकूण संख्या १६३ इतकी आहे.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘दिवाळीसाठी फटाके विक्री स्टॉल लावण्यासाठी ऑनलाइऩ बोली लावण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरून घेण्यास सुरवात झाली आहे. पैसे भरल्यानंतर व्यावसायिकांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी हे लिलाव केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Fire Kolhapur : स्मार्ट मीटरने अचानक घेतला पेट, कोल्हापुरातील कागलमधील घटना, महावितरणचा खुलासा

ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार १५ एप्रिलची मतदार यादी

‘लाडकी बहीण’चे पोर्टल बंद! ६५ वर्षांनंतर लाडकी बहीणचा लाभ बंद, पण २१ वर्षे झालेल्या महिलांना करता येईना योजनेसाठी अर्ज; अपात्र महिलांकडून वसुली नाही, पण...

Pune News : गुलटेकडी परिसरात ठेकेदाराने संपविले जीवन

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

SCROLL FOR NEXT